कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार : किशोरी पेडणेकर

मुंबई: देशासह महाराष्ट्रात करोनाचा कहर  दिवसगणिक वाढतच चालला आहे. परंतु दुसरीकडे करोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्यामहापौरकिशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या भाविकांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली.

तसेच,  मुंबईतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाही अपुरा असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परत आल्यावर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

तसेच, महापौर म्हणाल्या कि, कुंभमेळ्याहून परतणारे भाविक ‘प्रसाद’ म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. मात्र, जे भाविक मुंबईत परततील, त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like