राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; “मोदी ‘सिस्टिम’ला झोपेतून जागे करणे गरजेचे”

नवी दिल्ली :  देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना करोनापासून वाचविण्याची गरज आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असून, कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे.  अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत  काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.  मोदी सिस्टिमला झोपेतून जागे करणे गरजेचे आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

आने वाले समय में बच्चों को कोरोना से सुरक्षित करना होगा। पीडियाट्रिक स्वास्थ्य सुविधाएँ व वैक्सीन-इलाज के प्रोटोकॉल अभी से तैयार होने चाहिए।

देश के भविष्य के लिए वर्तमान मोदी ‘सिस्टम’ को नींद से जगाना ज़रूरी है।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2021

राहुल गांधी म्हणाले, “येणाऱ्या काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे.  भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”

यापुर्वी देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात  हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात  दोघांनाही सापडणे कठीण आहे.’, असे राहुल गांधी म्हणाले होते.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/G3QUYKDCYrv0LJH8z2pUkE

 

You May Also Like