राज कुंद्रांला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई । पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला काल अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

रायनलाही  केली  अटक 

राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे.  रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे. राज कुंद्रा यांनी रायनवर अश्लील व्हिडीओ लिंकची तांत्रिक बाब सोपवली होती. हे अश्लील चित्रपटांचे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालते, याविषयी रायनला सर्व माहिती होती असे चौकशीतून समोर आले आहे.

You May Also Like