महाराष्ट्रात होणाऱ्या लॉकडाऊन विषयी राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउन लावण्यासंबंधी औपचारिक निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. १४ एप्रिल ला मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून या बैठकीत लॉकडाउनसंबंधी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत दोन तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते.

लॉकडाउनसंबंधी विचारण्यात आलं असता राजेश टोपे यांनी सांगितलं की, “पुढील दोन दिवस अर्थ तसंच इतर विभागांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. बुधवारी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे.

“करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉकडाउन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. राज्यात लॉकडाउन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉकडाउन लागू केला जाणार नाही. सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी केली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल. बहुधा १५ तारखेनंतर राज्यात लॉकडाउन लागू केला जाऊ शकते. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत लॉकडाउनचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

तसेच, राजेश टोपे यांनी यावेळी टास्क फोर्समधील काही सदस्यांचं वेगळं मत असल्याची माहिती दिली. पण लॉकडाउनशिवाय दुसरा पर्याय नाही यावर बहुमत होत असं त्यांनी सांगितलं. ऑक्सिजन बेड आणि आयसीयूसंबंधी काही राज्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे असं ते म्हणाले आहेत. तसेच,  “रेमडेसिवीरचा साठा आणि प्रभावी उपयोग पुढील १५ दिवसांसाठी महत्वाची बाब आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा असल्याने फक्त ज्यांना तात्काळ गरज आहे त्यांनाच ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न असून पुढील १० ते १५ दिवस महत्वाचे असणार आहेत” असही ते म्हणाले.

दरम्यान, खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रेमडेसिवीरचा पुरवठा होईल असा निर्णय झाला आहे.राजेश टोपे यांनी रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिविरसंदर्भात डॉक्टरकडून अर्ज भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाल्याची माहिती दिली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like