राखी सावंत भररस्त्यात करत होती भालाफेकीचा सराव

मुंबई ।  ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत येत असते.  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला पाहून आता राखी सावंत सुद्धा प्रेरित होत आहे.  त्याच्यासारखं भालाफेकी करण्यापासून ती स्वतःला आवरू शकली नाही. मुंबईतल्या भररस्त्यात राखी सावंत नीरज चोप्राच्या स्टाइलमध्ये भालाफेकी करताना दिसून आली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

 

ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले. दरम्यान या खेळाबाबतची उत्कंठता राखी सावंत सुद्धा आवरू शकली नाही. तिने चक्क मुंबईतल्या रस्त्यावर उतरून भालाफेकी केली. तिच्या या चित्रविचित्र भालाफेकीचा व्हिडीओ तिने स्वतः इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

You May Also Like