मुंबई : महाराष्ट्रात करोना संसर्गाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत करोना झपाट्याने वाढत असून करोनासंसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली असून महाराष्ट्रात करोनाचे 5000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत करोनाचे 2479 नवे रुग्ण सापडले आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे 5218 रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी महाराष्ट्रात 3260 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या मुंबईत 1648 नवीन कोविड 19 रुग्ण आढळून आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 665, नागपूर 135, कोल्हापूर 72, अकोला 63, नाशिक 62, लातूर 31 आणि औरंगाबाद 24 रुग्ण आढळून आलेत. गुरुवारी मुंबईत कोरोनामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशभरात करोनाचे 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय गेल्या 24 तासांत करोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशातील एक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या 83,990 झाली आहे.
देशातील वाढत्या करोना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठक घेणार असल्याचे समजले आहे.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…