एकदाच रिचार्ज करा आणि दरमहा रिचार्जचे टेन्शनच संपवा, या प्लान्समध्ये सर्वच फायदे

नवी दिल्ली । Airtel, Jio, Vodafone Idea त्यांच्या युजर्सना १ दिवसाच्या वैधतेच्या प्लानपासून ते एक वर्षाच्या वैधतेच्या प्लानपर्यंतचे प्लान देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लान्सबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत ३,००० रुपयांपेक्षा कमी आहे.
—–Jio चे वार्षिक प्लान्स: कंपनी २,१२१ रुपये, २,३९९ रुपये आणि २,५९९ रुपये किंमतीचे तीन प्लान देत आहे. २,१२१ रुपयांच्या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. याशिवाय १.५ जीबी डेटा देण्यात आला आहे. यासोबत १०० एसएमएसही दिले आहेत. Jio अॅप्सची सदस्यता देखील उपलब्ध आहे.
२,३९९ रुपयांचा प्लान : २,३९९ आणि २,५९९ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त एकच मुख्य फरक आहे आणि तो म्हणजे २,५९९ रुपयांच्या प्लान मध्ये एक वर्षाचे Disney + Hotstar VIP सबस्क्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय, दोन्हीमध्ये फायदे समान आहेत. दोन्हीमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. यासोबत १०० एसएमएसही दिले आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.
—–Airtel चे वार्षिक प्लान्स : Airtel च्या २,४९८ च्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच ३६५ दिवसांची वैधता देखील देण्यात आली असून दररोज १०० एसएमएस देखील दिले जात आहेत. यासोबतच मोबाईल एडिशन फ्री ट्रायलचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.
२,७९८ च्या प्लान मध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध करून दिला जाईल. त्याच वेळी, दररोज १०० एसएमएस दिले जातील. ३६५ दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. यासोबत डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन आणि मोबाईल एडिशन फ्री ट्रायलचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.
—–Vi चे वार्षिक प्लान्स : कंपनीचा २,५९५ रुपयांचा प्लान कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची अनलिमिटेड सुविधा देते. तसेच १.५ GB डेटा प्रतिदिन दिला जातो. त्याचबरोबर दररोज १०० एसएमएसही दिले जात आहेत. त्याची वैधता ३६५ दिवस आहे.
२,३९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ GB डेटा दिला जाईल. यासोबतच दररोज १०० एसएमएसही दिले जात आहेत. वैधता ३६५ दिवस आहे. त्याचबरोबर दररोज १०० एसएमएसही दिले जात आहेत.

You May Also Like