रुग्णवाहिकेतून न आल्याने रुग्णालयाचा उपचारास नकार; प्राध्यापिकेचा मृत्यू

नवी दिल्ली  : रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्राणी बॅनर्जी या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी इंद्राणी बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.शुक्रवारी त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण यावेळी रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे इंद्राणी यांना गांधीनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. खासगी रुग्णालयानेही आपल्याकडे व्हेंटिलेटर तसेच इतर सुविधा नसल्याचं सांगितलं. त्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांनी बॅनर्जी यांना खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने EMRI 108 रुग्णवाहिकेतून आणलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आलं. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली होती. जेव्हा रुग्णालयाने इंद्राणी बॅनर्जींसाठी BiPAP ऑक्सिजन मशीनची व्यवस्था केली तोपर्यंत उशीर झाला होता. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like