Refusal to pay electricity bills of citizens of Mumbai, Thane and Raigad; 693.99 crore bill overdue

मुंबई : कोरोना काळात ग्राहकांना आलेली अव्वाच्या सव्वा वीज बील आकारण्यात आलं होतं. यामुळे अनेक ग्राहकांचे वीज बिल थकले आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणच्या ग्राहकांनी 693.99 कोटींचे बिल थकवले जात आहे. यात मुंबई, ठाणे, रायगडमधील विजेचे थकबाकीदार मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

वीजबिलाबाबत दिलासा नाही

राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले.

तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले देण्यात आली. आर्थिक स्थिती आधीच कमकुवत झालेल्या अनेकांनी विजेची बील भरले नाही. यानतंर या वीजबिलांवर सवलत दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र काही महिन्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्टीकरण दिले होते. वीजबिलाबाबत सरकारकडून काही ना काही सवलत मिळेल या आशेवर असलेल्या अनेकांची घोर निराशा झाली.

लाखो ग्राहकांचे वीजबील थकित

तर दुसरीकडे त्यांच्या विजेचे अनेक महिन्यांचे बील थकले. आतापर्यंत लाखो ग्राहकांचे तब्बल 693.99 कोटी रुपयांचे विजेचे बील थकले आहे. यातील बहुतांश थकबाकीदार हे मुंबई, ठाणे आणि रायगडमधील आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढली आहे. या सर्वांचा परिणाम वीज वितरण कंपन्यांना भोगावा लागत आहे.

एकूण किती वीजबिलाची थकबाकी

ग्राहक थकबाकी (काेटी रुपयांमध्ये)

उच्चदाब व घरगुती ग्राहक – 180.29 कोटी
व्यवसायिक ग्राहक – 140.94 कोटी
औद्योगिक ग्राहक – 150.85 कोटी
इतर वर्गवारीतील ग्राहक -18.3 कोटी
पाणीपुरवठा योजना – 7.66 कोटी
स्ट्रीट लाईट – 111.57 कोटी
कृषी ग्राहक – 4.39 कोटी

एकूण – 693.99 कोटीची थकबाकी

 

संबंधित बातम्या :

100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत

वाढीव वीजबिलावरोधात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा

वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन
———————-
मुंबई – कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकतही कोरोनाचता वेगाने प्रसार होत आहे. याच दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र आता मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल. असं ट्विट केलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

You May Also Like