लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांसाठी शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात

नवी दिल्ली : सध्या देशात आलेली करोनाची लाट हि अत्यंत भयंकर असल्याने केंद्र सरकारने नुकतीच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची घोषण केली आहे. लसीकरणाबाबत सरकारनं केलेल्या घोषणेनंतर आता 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना करोना लस दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया :

1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा
३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा
४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.
६. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.

दरम्यान, १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये रशियाची स्पुटनिक व्ही ही लस देखील काही लसीकरण केंद्रांवर पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं आहे. मात्र, फायझर आणि मॉडेर्ना या लसींबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!