तज्ज्ञांकडून दिलासा; चक्रीवादळा’चा धोका होतोय कमी

दिल्ली : तौत्के चक्रीवादळ आता ’धोकादायक चक्रीवादळा’च्या श्रेणीतून ’चक्रीवादळा’च्या श्रेणीत आलंय. अशी माहिती अहमदाबाद एमईटीचे प्रभारी संचालक मनोरमा मोहांती यांनी दिलीय.

अहमदाबादच्या पश्चिमेत 50 – 60 किलोमीटर अंतरावर ते जाऊ शकेल तर वार्‍याचा वेगही 45-55 किलोमीटर प्रती तासावर येईल, असंही मोहांती यांनी म्हटलंय. तौत्केचा वेग ओसरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर ती आणखी कमी होत जाईल, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. या चक्रीवादळात 3 जणांनी आपले प्राण गमावल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिलीयं.

या चक्रीवादळात जवळपास 40 हजार झाडं पडली तर जवळपास 16,500 घरांचं नुकसान झालयं. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 मिनिटांनी या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रात दीवपासून 95 किमी उत्तर-पूर्वोत्तर आणि अमरेलीच्या दक्षिणेस 10 किमी अंतरावर होता. दीवमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी भारतीय लष्करही सज्ज आहे. लष्कराच्या सहा पथकं यासाठी तैनात करण्यात आलेत. तसंच जुनागडमधील भागात लष्कराच्या अतिरिक्त सहा तुकड्या सज्ज आहेत. बोटाड, अमरेली तसंच भावनगर यांसारख्या भागांत या तुकड्या चक्रीवादळाचा सामना करतील.

You May Also Like