मृत्यूदर कमी करण्यात रेमडेसिवीरची मदत होत नाही : WHO

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण देशात तांडव सुरु केलाय, यावेळेची परिस्थितीही अतिशय भयावह झालेली आहे. दरम्यानरेमडेसिवीर इंजेक्शनचा महाराष्ट्रासह इतर काही राज्यात तुटवडा जाणवत असल्यामुळे रेमडेसिवीर मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना या इंजेक्शनबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आले आहे की करोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसेच आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचे दिसून आले नसल्याची माहिती . डॉ. स्वामिनाथन यांनी दिली.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल आम्ही सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. पण, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचे लक्ष्य असल्याचे डॉ. मारिया म्हणाल्या. रेमडेसिवीरच्या सुधारित डेटावर आमचे लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like

error: Content is protected !!