पुण्यात निर्बंध शिथिल : अजित पवारांच्या बैठकीनंतर निर्णय

पुणे  । राज्यात करोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण पुण्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे.

 

पुण्यात आता दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.  हॉटेल आणि रेस्टारंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पुण्यातील मॉल सुद्धा सुरू करण्यात आले असून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी दिली जाणार आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

You May Also Like