राजभवनाकडून खुलासा! त्या 12 आमदारांची यादी सापडली

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राजभवनातून गायब झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर एकच टीकेची झोड उडवली होती. पण, अखेर आता 12 सदस्यांची यादी गायब झाली नसून सापडली आहे, अशी माहितीच राजभवनातील सूत्रांकडुन मिळतेयं.

राजभवनाकडे विधान परिषद 12 सदस्यांची यादी आपल्याकडे आहे, असा दावा राजभवन सूत्रांनी दिली. यादी हरवली नाही, विनाकरण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावे नव्हती त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावे नाहीत, असे उत्तर दिले, अशी सारवासारव राजभवनाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. तसंच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली, असे राज्यभवनातील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली.

राज्यपाल नियुक्त जागेवरून महाविकास आघाडी आणि राजभवन असा संघर्ष होत होता. आता यावरूनच राजभवनामधील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत अधिकृत खुलासा केल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

You May Also Like