खून का बदला खून! साप चावला म्हणून त्यालाही चावून चावून मारलं

पाटना ।  बिहारमधील नालंदा गावात एका 65 वर्षीय वयस्कर व्यक्तीला साप चावला. यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीनी सापाला चावून चावून मारून टाकलं. मात्र सापाला चावल्याच्या काही वेळानंतर त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला.

 

 

दरम्यान, रामा महको याला सापाच्या पिल्लाने शनिवारी चावलं होतं. यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत महतोने सापाला पकडलं आणि त्याला चावून चावून मारून टाकलं. विशेष म्हणजे यावेळी महतो त्याला म्हणत होता, …तुझी हिम्मत कशी झाली..तू मला चावलास?? आता मी तुला चावणार…यानंतर ती व्यक्ती सापाला चावत राहिली. शेवटी सापाचाही यात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ही वयस्क व्यक्ती सापाला चावत होती, त्यादरम्यान सापाने त्या व्यक्तीच्या तोंडावर अनेक ठिकाणी चावे घेतले. यामध्ये वयस्क रक्तबंबाळ झाला होता. सकाळी जेव्हा ते हालचाल करीत नसल्याचं दिसलं तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

You May Also Like