ऋषभ पंतचा करोना अहवाल निगेटिव्ह

लंडन : इंग्लंडच्या दौऱ्यावरील भारतीय संघ सराव सामना म्हणून काउंटी टीम बरोबर डरहम येथे कसोटी सामना खेळणार आहे. या दरम्यान भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा यष्टीरक्षत फलंदाज ऋषभ पंत करोनामुक्त झाला असून लवकरच तो संघासोबत सरावात सामिल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, 8 जुलैला पंतला करोनाची बाधा झाली. त्याला एसिम्पटोमेटिक लक्षण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून तो विलगीकरणात होता आणि आता त्याचा विलगीकरण कालावधी रविवारी संपला असून त्याचा अहवालही  निगेटिव्ह आला. तसेच पंत दि . 22 जुलैपर्यंत भारतीय संघात पुन्हा सामिल होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्यत पंत मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

सराव सामन्याला सुरुवात

भारत आणि इंग्लंडच्या काउंटी टीममध्ये आज (20 जुलै) पहिला सराव सामना खेळवला जाणार आहे. सुट्टीवरुन परतलेला भारतीय संघ डरहममध्ये या सामन्यासाठी एकत्र आला आहे. मात्र याआधीच पंतचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने तो संघासोबत डरहमला आलेला नाही. एका नातेवाईकाच्या घरीच पंत विलगीकरणात होता. पण रविवारी त्याचा विलगीकरण कालावधी संपल्यामुळे तो लवकरच संघात सरावासाठी सामिल होईल.

साहा, भरत अरूण  विलगीकरणात

ऋषभ पंतसोबत संघाचे थ्रो डाउन स्पेशलिस्ट दयानंद हे देखील कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कात 3 आणि सदस्य अभिमन्यु ईश्वरन, ऋद्दिमान साहा आणि बोलिंग कोच भरत अरूण आले असल्याने या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरण कालावधी अजून संपला नसून 24 जुलैला संपू शकतो.

You May Also Like