व्हाइट फंगसचा धोका: पाटण्यात आढळले 4 रुग्ण

पाटणा : देशभरात ब्लॅक फंगस झालेले अनेक रुग्ण सापडत आहेत. पण, आता या ब्लॅक फंगसनंतर व्हाइट फंगस आले आहे. बिहारमधील पाटण्यात या व्हाइट फंगसचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या या व्हाइट फंगसचे पाटनामध्ये चार रुग्ण आढळले आहेत. हा व्हाइट फंगस (कँडिडोसिस) फुफ्फुसातील संक्रमणाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसासोबपतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित करतो.

डॉ. एसएन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी चार रुग्ण आढळली आहेत, ज्यांच्यात कोविड-19 ची लक्षणे होती, पण त्यांना कोरोना नसून व्हाइट फंगस होते. या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन, रॅपिड अँटीबॉडी आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह आल्या होत्या. हे सर्व रुग्ण फक्त अँटी फंगल औषधांची ठीक झाले.

व्हाइट फंगसमुळे फुफ्फुसात झालेले संक्रमण एचआरसीटीमध्ये करोनासारखेच दिसते. त्यामुळे करोना आणि व्हाइट फंगसमध्ये अंतर करणे अवघड आहे. व्हाइट फंगस झालेल्या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह येतात. एचआरसीटीमध्ये करोना सारखे लक्षण दिसल्यानंतर रॅपिड अँटीबॉडी टेस्ट आणि फंगससाठी बलगमचा कल्चर करणे गरजेचे आहे. व्हाइट फंगसची कारणे ब्लॅक फंगससारखेच आहेत. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असणे, डायबिटीज, अँटीबायोटिकचे सेवन किंवा अनेक दिवसांपासून स्टेरॉयड घेत असलेल्या रुग्णांना व्हाइट फंगसचा धोका आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या व्हाइट फंगसचा सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांच्या फुफ्फुसांवर हे आक्रमण करू शकते.

You May Also Like