रोहित शर्माला ‘भगोडा’ म्हटले? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज 15 वर्ष पूर्ण केली आहे. यानिमित्त त्याने भावनिक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहे. असे असतांनाच आता रोहितला ‘भगोडा’ म्हटल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर अनेक सीनीयर खेळाडूंना विश्रांती देत, युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिकेसाठी संधी दिली होती.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय संघावर टीका होत होती. तसेच ज्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, त्या खेळाडूंवर जोरदार टीका केल्या गेल्या होत्या.

एका न्यूज चॅनेलच्या डिबेट शोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार 35 वर्षीय खेळाडूवर टीका करताना काही अपमानास्पद शब्द वापरताना ऐकू येतोयत.

 

काय आहे व्हिडिओत :

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा उल्लेख करताना कहा है भगोडा? असे म्हटले. तसेच त्याच्या बॉडीवरून टीका केली आहे.

रोहितला व्हेकेशनवर जाण्याची गरज नव्हती. प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मालिका गमावण्याऐवजी मुंबईच्या फलंदाजानी त्यात खेळले असते तर बरे झाले असते, अशी टीप्पनीही देखील करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like