बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जाहीर

मुंबई ।  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने शुक्रवारी दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर केला होता. मात्र अद्याप राज्याच्या शिक्षण मंडळाने शेवटचा दिवस असतानाही अद्याप निकालाबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज तरी बारावीचा निकाल जाहीर होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा २०२१ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

 

असा पाहा आपला बैठक क्रमांक

  • मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/  या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.
  • खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशी माहिती भरा.
  • इंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल.

You May Also Like