सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रुममेटला अटक

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता एनसीबीने त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. गेल्यावर्षी या घटनेने संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन विश्व हादरून गेलं होतं.

देशातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. या घटनेचा तपास सध्या एनसीबीकडे आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागणार असा प्रश्न उभा राहत आहे.

एनसीबीने सिद्धार्थ पिठानी या सुशांतच्या मित्राला अटक केली आहे. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थच्या अटकेची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक केली आहे.

You May Also Like