आरएसएस नेत्याच्या मुलाने केली आत्महत्या

बागपत । लसीकरण केंद्रात झालेल्या वादातून पोलिसांनी आपल्या घरावर हल्ला करून आपल्या मातोश्रींना धक्काबुक्की केल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय असे या आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून त्याचे वडिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

 

दरम्यान, अक्षय हा आपल्या आईला घेऊन काल लसीकरण केंद्रात गेला होता. आपली आई वृद्ध असल्याने तिचे प्रथम लसीकरण व्हावे तिला रांगेत उभे राहायला लागू नये अशी त्याची सुचना होती. त्यातून त्याचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी त्यावेळी अक्षयला तेथेच मारहाण केली. रणच्छड गावातील लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी अक्षयच्या घरात जाऊन तेथे मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आणि त्याच्या आईलाही धक्‍काबुक्की केली. या प्रकरणात दहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

 

You May Also Like