बाहेर राज्यातून येणाऱ्यांना RTPCR बंधनकारक : महाविकास आघाडी

मुंबई, 18 एप्रिल : देशासह महाराष्ट्रातही करोनाबाधित  रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने राज्यासाठी आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आता 48 तासांच्या आत RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे.ज्या प्रवाशांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली असेल त्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने अधिसूचना काढत जाहीर केले आहे.

राज्य सरकारने गोवा, उत्तराखंड, गुजरात, केरळ, दिल्ली NCR आणि राजस्थान या राज्यांना कोविड 19 संसर्ग संदर्भात संवेदनशिल जाहीर केले आहे. त्यामुळे या सर्व 6 राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आता 48 तासांच्या आत RTPCR चाचणी करणं बंधनकार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. तसंच जे प्रवाशी 48 तासाच्या आतील RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आणणार नसतील त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरच अॅन्टीजेन चाचणी करण्याचे आदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत

दरम्यान, रेल्वेने या 6 संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात निघणाऱ्या एक्स्प्रेसची आणि त्यातल्या प्रवाशांची सर्व माहिती 4 तास आधी राज्य सरकारला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी महाराष्ट्रातील कुठल्या रेल्वे स्थानकावर उतरणार याचीही माहिती रेल्वेने राज्य सरकारला द्यायची आहे.

तसच, रेल्वेने आरक्षित तिकीट असणाऱ्यांना प्रवासाची परवानगी द्यावी. रेल्वेने फक्तं आरक्षित तिकीटंच वितरीत करावी. आरक्षित तिकीट नसणाऱ्यांना प्रवास करू देऊ नका, असे आदेश राज्य सरकारने अधिसूचना काढत रे

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

You May Also Like