देशात युद्धजन्य परिस्थिती, संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई : करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यामुळे चिंतेत भर पडत आहे .रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान,  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली. त्यात ते म्हणाले की, वाढत्या कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात युद्धजन्य परिस्थितीसारखे वातावरण आहे. युद्धातील बॉम्बहल्ल्यात जशी माणसं मरतात तशी माणसं मरत आहेत. कोरोनाची आकडेवारील लपवण्याचे प्रकार बंद झाले आहेत. चिता जळताना दिसत आहेत. रुग्णसंख्या अजून वाढली तर देशात अराजक निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेचं दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवावं. यामध्ये आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळून सहभागी होऊ. या अधिवेशात खासदारांना आपापल्या राज्यामधील समस्या मांडता येतील, असे राऊत यांनी सांगितले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

You May Also Like