सॅनोटाईज कंपनीचा दावा ! स्प्रे करोना रोखण्यात 99% प्रभावी

भारतात लवकरच होणार उपलब्ध
नवी दिल्ली : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात इतक्या लवकर लस देणे शक्य नाही. या दरम्यान, कॅनेडियन कंपनी सॅनोटाईजफचा एक नोझल स्प्रे जगभरात चर्चेचा विषय होत आहे. सेनोटाइज कंपनीचे म्हणने आहे कि, हा स्प्रे ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील क्लिनिकल ट्रायलमधून गेला आहे, ज्यामध्ये तो 99 टक्के प्रभावी ठरला आहे.

दरम्याण, या नोझल स्प्रेची टेस्टिंग आमच्या लॅबमध्ये केल्यानंतर त्याचा मॅन्युफेक्चरिंग फॉर्मुला यूएसच्या यूटा स्टेट युनिव्हर्सिटीला पाठवलायं. तेथे विद्यापीठाच्या अँटी व्हायरल इंस्टीट्यूटने लॅब टेस्ट केल्यानंतर हा 99 नाही तर 99.9% प्रभावी असल्याचे सांगितले.

आम्ही जगातील सर्वात चांगली आणि विश्वासार्ह पद्धती मडबल ब्लाइंड प्लेसबो कंट्रोलफ वापरली. त्यासाठी दोन गट तयार केले गेले. एका ग्रुपला प्लेसबो म्हणजेच सामान्य नोझल स्प्रे देण्यात आला आणि दुसर्याला सॅनोटाईज नोझल स्प्रे देण्यात आला. गटातील कोणालाही काय देण्यात आले ते माहिती नव्हते. आम्हाला यामध्ये असे आढळून आले की, 24 तासांच्या आत सॅनोटाईज नोझल स्प्रेचा वापर करणार्‍या लोकांमध्ये 95% पर्यंत व्हायरल लोड कमी झाला. यासोबतच 3 दिवसाच्या आत व्हायरल लोडमध्ये 99 टक्क्यांनी घट झाली. हे सर्व कोविड पॉझिटिव्ह लोक होते.

नोझल स्प्रे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात आधीच उपस्थित आहे. हा नोझल स्प्रे नायट्रिक ऑक्साईडपासून बनलेला आहे. हा रासायनिक घटक आपल्या शरीरातील प्रत्येक भागात आधीपासून असतो, म्हणून मानवी शरीराला याच्यासोबत ऍडजेस्ट करण्यात कोणतीही अडचण येत नाही. नायट्रिक ऑक्साईड हे अँटी इफेक्टिव्ह मायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसची ग्रोथ रोखणारे केमिकल आहे. हे एखाद्या हॅन्ड सॅनिटायझरप्रमाणे काम करते. असे त्यांनी सांगितलंय.

You May Also Like