दुसरी कसोटी; ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य

लंडन । पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार  आहे.  पहिल्या सामन्यातील भारताची विजयाची संधी पावसाने हिरावल्यानंतर विराट सेना नव्या आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. मात्र, यावेळी भारताच्या फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करावा लागेल.

 

भारतीय संघात बदलाची शक्यता कमी असली, तरी यावेळी कर्णधार कोहली आपला सर्वोत्तम ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला अंतिम संघात स्थान देऊ शकतो. मात्र, या सामन्यात भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरीची आशा आहे. स्वत: कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना पहिल्या सामन्यात यश आले नव्हते. २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात रहाणेने लॉर्ड्सवर शतक झळकावण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीयांच्या सर्व नजरा रहाणेवर असतील.

 

 

 

भारत  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.

इंग्लंड  जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, मोईन अली, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्रॉली, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली आणि मार्क वुड.

You May Also Like