सेन्सेक्स, निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर

मुंबई ।  राज्य सरकारने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. एकीकडे एस अँड पी बीएसई सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला असून दुसरीकडे  निफ्टी 50 ने १६ हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे शेअर बाजारानं निर्बंध शिथिल केल्याचं पहिल्याच दिवशी जोरदार स्वागत केल्याचं दिसून येत आहे.

 

दुपारी एकच्या सुमारास मुंबई शेअर बाजारात प्रचंड उत्साहवर्धक स्थिती निर्माण झाली. यामध्ये सेन्सेक्सनं तब्बल 558 अंकांनी उसळी घेत ५३ हजार 509.04 पर्यंत मजल मारली असून दुसरीकडे निफ्टी फिफ्टी देखील पहिल्यांदाच १६ हजारांवर गेला आहे. बाजारात निर्माण झालेल्या या सकारात्मक उर्जेमुळे आयटी आणि कन्झ्युमर स्टॉक्समध्ये देखील घसघशीत भर पडली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!