निर्मात्यांवर केले गंभीर आरोप; अभिनेत्रीनं सोडला चित्रपट

नवी दिल्ली : गेल्या काही काळात सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी स्वत:हून पुढे येत त्यांच्यासोबत झालेल्या गैरव्यवहारांबाबत खुलेपणाने सांगितलं. या यादीत आता अभिनेत्री अलंकृता सहाय हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. अलंकृता सहाय ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही काळात ती फुफ्फड जी या पंजाबी चित्रपटाचं शूटिंग करत होती. परंतु शूटिंग दरम्यान निर्मात्यांनी लैंगिक गैरवर्तणुक केल्यामुळं तिनं चित्रपट सोडून दिला.

 

अलंकृतानं हा धक्कादायक खुलासा केला. निर्मात वारंवार तिच्या शरीरयष्टीवर टीका करत होता. अश्लील कमेंट्स करत होता. त्याच्या या लैंगिक गैरवर्तणुकीला कंटाळून तिनं चित्रपट सोडून दिला. निर्मात वारंवार तिच्या शरीरयष्टीवर टीका करत होता. अश्लील कमेंट्स करत होता. त्याच्या या लैंगिक गैरवर्तणुकीला कंटाळून तिनं चित्रपट सोडून दिला.

 

ती म्हणाली, सुरुवातीला आमचे मदभेद हे चित्रपटांशी निगडीत होते. परंतु कालांतरानं निर्मात्यांनी माझ्यावर अश्लील कमेंट्स करण्यास सुरुवात केली. सर्वांसमोर मला शिव्या दिल्या जायच्या. या प्रकरामुळं माझ्य आत्मसन्मास ठेच पोहोचली होती. त्यामुळं मी चित्रपट सोडून दिला. अलंकृतानं मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शिवाय तिनं काही जाहिराती देखील केल्या आहेत. नमस्ते लंडन या चित्रपटामुळं ती खर्‍या अर्थानं प्रकाशझोतात आली.

You May Also Like