सीरमने इन्स्टीट्यूटने केंद्र सरकारला धरले जबाबदार..जाणून घ्या कारण

पुणे : राज्यभरात लशींचा तुडवडा निर्माण झाला असून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असे ज्या मोहिमेचे वर्णन केले जाते त्या मोहिमेला खिळ बसल्याचे चित्र दिसतेय. सुरुवातीला 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर पुढे 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र लशींच्या कमतरतेमुळे ही मोहीम प्रभावित झाली आहे. या परिस्थितीवरून पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती करणार्‍या कंपनीने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लशीबाबतच्या स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. केंद्र सरकारने लशीच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, असे सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.

लशीच्या उपलब्धतेचा विचार न करताच केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला नसल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यायची गरज असते. लसीकरण गरजेचेच आहे, मात्र लसीकरण केल्यानंतरही अनेक जणांना करोनाची लागण होत आहे. करोना होऊ नये यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे, असे जाधव यांनी सांगितलंय.

You May Also Like