सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचा शॉट कायशा कंपनीसोबत करार

पुणे । करोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. तसेच, नव्या करोनाबाधितांची संख्या देखील घटू लागल्याचं गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यात व्यापक लसीकरणाची मोहीम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. काही राज्यांकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी अर्थात ५० टक्के शेअर्स सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत.

 

 

You May Also Like