शेवाळी ग्रा.पं. सरपंचपदी चित्रा नांद्रे बिनविरोध

साक्री : शेवाळी. दा. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच यमुनाबाई नथू साळुंके यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेवर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सरपंचपदी चित्रा नांद्रे यांची बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेत प्रशासकिय निवडणूक निर्णय अधिकारी अनिल बाविस्कर, ग्रामसेवक भरत पाटील, तलाठी स्वप्नील देशमुख यांनी कामकाज पाहिले. सरपंच पदासाठी एकमेव चित्रा नांद्रे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी उपसरपंच पंढरीनाथ साळुंके, अरुण नेरकर, केतन साळुंके, अर्चना साळुंके, पार्वताबाई पवार, कविता पगारे, मंगलाबाई भदाणे, मच्छिंद्र गायकवाड, दादा बागुल, आदी सदस्य उपस्थित होते.

सरपंच चित्रा नांद्रे या माजी उपसरपंच तथा भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदीपकुमार नांद्रे यांच्या पत्नी असून कामगार नेते किरण नांद्रे, उद्योजक शशिकांत नांद्रे यांच्या भावजय आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनवणे, जि.प सदस्य विजय ठाकरे, प स सदस्य ललित सोनवणे, रमाकांत अहिरराव, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, योगेश देसले, मुन्ना देवरे, उत्पल नांद्रे, दिनेश सोनवणे,भाजपा अध्यक्ष वेडू सोनवणे, संघटक सुरेश शेवाळे आदींनी सत्कार केला. यावेळी गंगाधर नांद्रे, संजय नांद्रे, राजेंद्र साळुंके, संतोष नांद्रे, गोरख साळुंके, डॉ अविनाश शेवाळे, भटू साळूंके, संतोष साळुंके, नंदकुमार नांद्रे, अमोल नांद्रे, अशोक साळुंके, प्रवीण नांद्रे आदी उपस्थित होते.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी उपसभापती नितीन साळुंके, मुख्याध्यापक निंबाजी साळूंके, माजी सरपंच दिपक साळुंके, दगाजी साळूंके, माधवराव नांद्रे, अरूण नेरकर, अध्यक्ष अरूण साळुंके, सचिव एम.एन.पाटील, माजी सरपंच साहेबराव साळुंके, कॉ.नामदेव साळूंके, पोपट साळुंके, उत्तमराव माळचे, सुपडू माळचे, यादवराव वाघ यांनी परिश्रम घेतले.

You May Also Like

error: Content is protected !!