बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी शिवसेना स्थापनादिनाचा कार्यक्रम

पारोळा : पारोळा बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी शिवसेना स्थापनादिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी खंत व्यक्त करत स्वकीय आणि विरोधकांना टोला लगावला आहे. जिल्ह्यात काही जणांना वर्चस्व सहन होत नाही म्हणून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात अश्या कुरघोड्या झाल्या तरी त्याला भीत नाही, असेही आ. चिमणराव पाटील म्हणाले.

पारोळा बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी शिवसेना स्थापनादिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कुरघोळ्या करणाऱ्यांकडे लक्ष न देता मतदार संघात विकासालाच प्राधान्य देऊ

शिवसेनेसारखं संघटन हे जगात कुठेही नाही. गेली पन्नास वर्षे एक नेता. एक वक्ता. एक संघटना हि व्याख्या जगात कुठल्याच राजकीय पक्षात नाही. सध्या राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या साडेतीन वर्षात आपण मतदारसंघात कुठलीही कामे बाकी ठेवणार नाही. आपण सत्तेत आहोत, त्यामुळे कुरघोळ्या करणाऱ्यांकडे लक्ष न देता मतदार संघात विकासालाच प्राधान्य देऊ. मजबूत कार्यकर्ते आहेत त्याच्या भरवश्यावर आपण निवडणूक लढवत आलो आहोत, असेही पाटील म्हणाले.

You May Also Like