शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा राडा, कार्यकर्त्यांमध्ये तुफान धुमश्चक्री

सिंधुदुर्ग : शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येतेयं. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका उपक्रमाचं आयोजन केले. मात्र या आयोजनात त्यांनी भाजपला डिवचण्याचाही प्रयत्न केला. वर्धापनानिमित्त वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. उपक्रमानुसार एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केलं. मात्र ते पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचं होतं.

 

पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तिथे भाजपचे कार्येकर्ते आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या आक्षेपाचं रुपांतर वादात झालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेतला. ते सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ ठळला असल्याची माहिती मिळतेयं.

वैभव नाईक यांच्या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार होतं. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणार्‍यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार होतं.

You May Also Like

error: Content is protected !!