आमदार पाटलांसह शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर । मागील काही दिवसांपासून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले नाही. विशेष म्‍हणजे सत्‍ताधारी असलेल्‍या शिवसेनेच्‍या आमदारांनी केलेल्‍या मागणीची दखल घेतली न गेल्‍याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्‍यासह शिवसेनेकडून धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या महिनाभरापुर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता.

You May Also Like