शोएब अख्तर पुन्हा बरळला

मुंबई | आयपीएलचा उर्वरित हंगाम संपल्यानंतर विश्वचषक होणार आहे. मात्र स्पर्धेच्या अगोदर आजी-माजी क्रिकेटपटूंनी तर्क-वितर्क लावायला सुरूवात केली आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाक सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे.

 

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अंतिम सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानशी टक्कर घेईल. मात्र यावेळी पाकिस्तानी संघ भारताला मागे टाकेल, असंही शोएब अख्तर म्हणाला आहे. स्पोर्ट्स तक यूट्यूब वाहिनीवर बोलत होता. मला वाटते टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि भारत खेळतील आणि भारत पाकिस्तानकडून पराभूत होईल. यूएईमधील अटी भारत आणि पाकिस्तान या दोघांना अनुकूल असतील, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. मात्र आत्ता पर्यंतचा इतिहास पाहता भारत विश्वचषकामध्ये पाकिस्तानसोबत एकदाही हरलेला नाही.

 

 

दरम्यान, पाकिस्तानचा अखेरचा टी-20 विश्वचषक सामना 2016च्या हंगामात कोलकाता येथे झाला होता. यात भारताने पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला होता. मात्र भारतीयांच्या मनात सल आहे ती 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा 180 धावांनी पराभव झाला होता.

You May Also Like