धक्कादायक! मंत्रालयासह 80 टक्के दक्षिण मुंबई जाणार पाण्याखाली; आयुक्तांचा इशारा

मुंबई ।  मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबई शहरासंदर्भात एक भयावह भविष्यवाणी केली आहे. नरिमन पॉइंट आणि मंत्रालय आदींसारख्या अत्यंच महत्त्वाच्या इमारती असलेल्या दक्षिण मुंबईचा एक मोठा भाग समुद्राची पाणीपातळी वाढल्यामुळे 2050पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती आहे, असं चहल म्हणाले. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे  यांच्या हस्ते  मुंबई हवामानबदल नियोजनासंदर्भातल्या वेबसाइटचं उदघाटन करण्यात आलं.

 

 

यावेळी चहल बोलत होते. त्यांनी सांगितलं, की दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा 70 टक्के भाग हवामानबदलाच्या विपरीत परिणामांमुळे जलमय होऊन जाईल. हवामानबदलासाठी स्वतःचं नियोजन तयार करून त्यावर काम करणारं मुंबई  हे दक्षिण आशियातलं पहिलं शहर आहे असंही चहल यांनी स्पष्ट केलं. चहल म्हणाले, निसर्ग आपल्याला संकेत देतो आहे; मात्र आपण जागे झालो नाही, तर भयानक परिस्थिती येऊ शकते. कफ परेड  नरिमन पॉइंट  मंत्रालय आदी 80 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतात. ही येत्या 25-30 वर्षांतली गोष्ट आहे.

You May Also Like