धक्कादायक : प्रियकर – प्रेयसीला संबंध ठेवल्याप्रकरणी 100 चाबकाच्या फटक्यांशी शिक्षा

आचे : आचे प्रांतातील ल्होकसेउमावे येथे लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा केल्याप्रकरणी प्रियकर-प्रेयसीला दोषी ठरवून सार्वजनिक ठिकाणी 100-100 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. चाबकाच्या फटक्यांमुळे प्रियकर आणि प्रेयसी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमा आणि प्रचंड रक्तस्त्राव यामुळे प्रेयसीचा मृत्यू झालांय. गंभीर जखमी असलेल्या प्रियकरावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण आचे प्रांतात शरिया कायद्यांविषयी प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. नकळत झालेल्या चुकीसाठीही शरिया कायद्यात कठोर शिक्षा आहे. यामुळे नागरिक सतत दहशतीच्या वातावरणात आहेत. तसेच या घटनेमुळे प्रांतातील सामान्य नागरिकांमधील शरिया कायद्यांविषयीची दहशत आणखी वाढली आहे.

संपूर्ण इंडोनेशियात फक्त आचे प्रांतातच शरिया कायदे लागू आहेत. देशातील इतर प्रांतांनी अद्याप शरिया कायदे लागू केलेले नाही. शरिया कायद्यात दारू पिणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे, लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणे, समलैंगिक संबंध ठेवणे हे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांसाठी दोषींना सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारले जातात.

मानवाधिकार संघटनांचा विरोध तीव्र होत असल्याचे पाहून 2018 मध्ये आचे प्रांताच्या प्रशासनाने चाबकाच्या फटक्यांची शिक्षा रद्द करण्याबाबत विचार करू, असे सूतोवाच केले होते. पण अद्याप चाबकाच्या फटक्यांची शिक्षा रद्द झालेली नाही.

You May Also Like