coronavirus : धक्कादायक ! महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा ३०२ वर

मुंबई : महाराष्ट्रात एका दिवसात 72 करोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे. आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे.

आज सकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या करनोग्रस्तांची संख्या 230 होती. मात्र आता संध्याकाळपर्यंत ही संख्या 302 वर पोहचली आहे. एकट्या मुंबईत एका दिवसात 59 रुग्ण आढळले आहेत. मुंबईची चिंता वाढलीच आहे पण त्याचसोबत एका दिवसात इतके रुग्ण वाढल्याने महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात आज 72 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 59 रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.