धक्कादायक! भरदिवसा डॉक्टर दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या: घटनेचा व्हिडिओ व्हायरल

राजस्थान : भरतपूरमध्ये शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजता एका डॉक्टर दाम्पत्यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याता आल्याची घटना घडली आहे. भरतपूर शहरातील हरीदास बस स्टँड परिसरात हा हत्येचा थरार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुचाकीवर आलेले दोन्ही आरोपी गोळ्या झाडून पसार झाले आहेत.

गाडीचा पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी शहरातील रस्त्यावर डॉक्टर दाम्पत्याची गाडी गाठली. त्यानंतर, आपली दुचाकी थांबवून गाडीत बसलेल्या डॉक्टर सुधीर गुप्ता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत डॉक्टर दाम्पत्य जागीच ठार झालं असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मागील भांडणाच्या वादामुळे निर्माण झालेल्या रागातून सूड घेण्याच्या हेतुने हे हत्याकांड करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एका तरुणीच्या हत्याप्रकरणात डॉक्टर दाम्पत्याचा सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. डॉ. सुदीप गुप्ता (४६) आणि त्यांची पत्नी सीमा गुप्ता (४४) यांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या या दोन हल्लेखोरांची ओळख 2019 मध्ये हत्या झालेल्या महिलेचा भाऊ आणि चुलत भाऊ म्हणून झाली आहे.

“२०१९ मध्ये, डॉक्टरची पत्नी आणि त्याच्या आईने त्यांच्या घरात जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली डॉ. सुदीप यांचा संबंध असलेल्या एका महिलेचा मुलासह मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉक्टर, त्याची पत्नी आणि त्याची आई हे सर्व तुरूंगात होते आणि सध्या तिघेही जामिनावर आहेत, अशी माहिती भरतपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र बिश्नोई यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी डॉक्टर जोडीला अनुज गुर्जर आणि दीपाचा भाऊ आणि महेश गुर्जर यांनी भरतपूर येथील हरीदास बस स्टँड परिसरात या  जोडप्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले

याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक बिश्नोई यांनी सांगितले.

You May Also Like