धक्कादायक ! दुचाकीने आले विष प्यायले अन आत्महत्येसाठी पुलावरून मारली नदीपात्रात उडी

शिरपूर ।  तालुक्यातील गिधाडे येथील तापी नदीपुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली आहे. मात्र आत्महत्या कोणी केली हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. याबद्दल पोलिसांकडे विचारणा केली असता दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र पुलावरून तिघांनी उडी घेतल्याचं प्रत्यक्षदर्शींनी लोकमतच्या प्रतिनिधींना सांगितलं.

 

 

घटनास्थळावर  आढळून आलेल्या चपला, औषधाची बाटली

 

याबाबत वृत्त असेल कि, शिरपूर तालुक्यातील गिधाडे तापी नदी पुलावरुन तीन जणांनी आत्महत्या केल्याचे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पुलावर एक मोटारसायकल आढळून आली आहे. त्यात एका पुरुषाच्या व महिलेच्या चप्पला, विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे. मात्र आत्महत्या कोणी केली याबाबत समजू शकलेले नाही. मात्र तापी पुलावर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती प्राप्त झालेली नाही. घटनास्थळी शिंदखेडा पोलीस पथक दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

You May Also Like