धक्कादायक! इराणने भारताला ’या’ प्रकल्पातून हटवले!

तेहरान : इराणने चीनसोबत आगामी 25 वर्षांसाठी केलेल्या महाकराराचे परिणाम दिसू लागले आहे. या भारताला अब्जावधी डॉलरचा फटका बसला आहे. इराणने फरजाद बी गॅस प्रकल्पातून भारताला वगळले आहे. या गॅस फिल्डचा शोध भारताच्या ओएनजीसी विदेश लिमिटेडने केला होता. इराणच्या राष्ट्रीय इराणीयन ऑईल कंपनीने पेट्रोपर्स कंपनीसोबत 1.78 अब्ज डॉलर्सचा करार केला. इराण हा प्रकल्प आता स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय.

फरजाद-बी गॅस प्रकल्पात सुरुवातीपासून अंतर्विरोध होता. ओएनजीसी विदेशच्या नेतृत्वात भारतीय कंसोर्टियने 2002 मध्ये एक करार केला होता. त्यावेळी 40 कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती. गॅस साठ्याचा शोध लागल्यानंतर 2009 मध्ये इराणने या कराराची मुदत संपू दिली होती. भारतीय कंसोर्टियम आपल्या गुंतवणुकीची वसुली कशी करेल, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. भारताकडून कराराच्या अटी-शर्तीमध्ये वारंवार बदल केले गेले. करार उशीर करण्यास इराण जबाबदार असल्याचे भारताने म्हटले होते.

या वर्षी चीनसोबत 25 वर्षांसाठी 400 अब्ज डॉलरचा करार इराणने केला होता. अमेरिकेच्या निर्बंधामुळे कठीण आर्थिक स्थितीत असणार्‍या इराणला यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आता इराणने स्वत:च फरजाद गॅस प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्याण, चीनच्या मदतीने विकसित करण्यात आलेले ग्वादर बंदर हे चाबहारपासून फक्त 100 किमी अंतरावर आहे. रणनितीच्यादृष्टीने भारतासाठी इराण हा महत्त्वाचा देश आहे. एकेकाळी इराणकडून भारताला मोठ्या प्रमाणावर इंधन पुरवठा करण्यात येत असे. मात्र, अमेरिकेच्या दबाबामुळे भारताने इराणकडून होणारी तेल आयात कमी केली. त्यानंतर इराणला चीनने मदतीचा हात दिला. इराणमध्येही चीनचा हस्तक्षेप वाढल्यास भारतासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

You May Also Like