धक्कादायक..मान मोडून केली मित्राची हत्या, लपवण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला

आलोट : मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. मोबाइलवर फ्री फायर गेम खेळण्यासाठी त्याला गावाबाहेर बोलावण्यात आले. त्यानंतर खेळताना गेमच्या टास्क प्रमाणे मित्राची मान जोरात फिरवली. नंतर त्याच्या मानेचे हाड तुटले आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्याण, मुलगा घरी पोहोचला नसल्याने कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला असता पोलीस चौकशीत आरोपी पकडले गेले.

रतलामच्या आलोटपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दयालपुरा गावातील ही धक्कादायक घटना आहे. मृत मुलाचे नाव विशाल सिंह असून तो 15 वर्षांचा होता. तो नववीत शिकत होता. आरोपी उल्फत सिंह (18) आणि 16 वर्षांचा एका अल्पवयीन मुलगा हे त्याचे मित्र होते. तिघांना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याची सवय होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विशालचे वडील नेपाल सिंह यांनी त्यांचा मुलगा शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. रात्री 9 वाजता एक कॉल आल्यानंतर मृत मुलाने आपल्या वहिणीला बाहेर जात असल्याचं सांगून गेला होता अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर घरी न परतल्याने त्याला रात्रभर शोधूनही तो सापडला नाही. दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर गावात चौकशी सुरू केली. विशाल शेवटचा उल्फत आणि दुसर्‍या एका मित्राबरोबर बाईकवर जाताना दिसला होता, अशी माहिती गावकर्‍यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली तर ते पोलिसांच्या प्रश्नाला प्रतिसाद न देता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते.

अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात तर दुसर्‍या आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही गळ्याचं हाड तुटल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केलाय.

You May Also Like

error: Content is protected !!