धक्कादायक! शिकारीच्या शोधात बिबट्याचा सोसायटीत वावर

मुंबई |   मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गोरेगाव पूर्व येथील एका हाय सोसायटीत रात्रीच्या सुमारास बिंदास्त फिरताना आढळला होता. बिबट्याचा संबंधित सोसायटीत फिरतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण पसरलं होतं.

 

 

आपल्या सोसायटीत रात्री बिबट्याचा वावर असतो, ही बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातील न्यु दिनदोशी गार्डन सोसायटीतील आहे. गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा याठिकाणी बिबट्याचा वावर आढळला आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्यानं या सोसायटीत प्रवेश केला होता. शिकारीच्या शोधात हा बिबट्या सोसायटीत शिरला होता. सुदैवाची बाब म्हणजे, दरम्यान कोणीही पार्किंग परिसरात नव्हतं. त्यामुळे मोठी हिंसक घटना टळली आहे.

You May Also Like