धक्कादायक : अल्पवयीन मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा खुपसला चाकू

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. 14 वर्षांच्या एडन फूसी या अल्पवयीन तरुणाने 13 वर्षांची चिअरलीडर ट्रिस्टन बेलीची हत्या केल्याचा आरोप आहे. एडनने बेलीच्या पोटात 114 वेळा चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. पूर्वोत्तर फ्लोरिडातील जंगलात 13 वर्षांच्या चिअरलीडरचा मृतदेह सापडला होता.

जॅक्सनविलेतील दक्षिणेला डर्बिन क्रॉसिंग समुदायाच्या सामुदायिक केंद्रात बेली 9 मे रोजी अखेरची दिसली होती. सेंट जॉन्स काउंटी शेरिफ कार्यालयात बेलीच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर एका शेजार्‍याला बेलीचा मृतदेह जंगलात सापडला होता. त्याच्या दुसर्‍याच दिवशी फूसीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

सेंट जॉन्स काउंटीतील स्टेट अ‍ॅटर्नी कार्यालयाने गुरुवारी ग्रँड ज्युरीच्या माध्यमातून एडन फूसी याला प्रथम श्रेणी हत्येच्या आरोपाखाली आरोपी घोषित केले आहे. सोबतच एडन फूसी प्रकरण ज्युवेनाईल कोर्टाऐवजी प्रौढ कोर्टात शिफ्ट करण्याची नोटीस देण्यात आली आहे. आरोपी एडन फूसीला आजन्म कारावास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

You May Also Like