धक्कादायक! आंध्रात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं?

नवी दिल्ली ।  आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे.  ३०० भटक्या श्वानांना विष देऊन मारण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिंगापालेम गावात 300 हून अधिक श्वानांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राणी मित्र संघटनांनी लिंगापालेम गाव पंचायतीला जबाबदार धरलं आहे. कुत्र्यांना दफन करत असताना ही घटना उघड झाली.

 

 

फाइट फॉर अ‍ॅनिमल्स एक्टिविस्ट ललिता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस देखील अधिक तपास करत आहेत. ललिता यांनी ग्राम पंचायतीने श्वानांची नसबंदी करण्याऐवजी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि विषाचं इंजेक्शन देऊन मारून टाकलं असं म्हटलं आहे. तसेच त्या गावात गेल्या होत्या. तिथे त्यांनी 300 हून अधिक श्वानांना दफन केलं जात असल्याचं पाहिलं. तसेच याचा एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याचा दावा करण्यात येत आहे.

 

You May Also Like