धक्कादायक! प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली;  दुर्घटनेचा VIDEO आला समोर

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटकातील मंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनवर शुक्रवारी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोव्यामध्ये झाली आहे. ज्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

 

 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेल 01134 मंगळुरू जंक्शन – सीएसटी टर्मिनस एक्सप्रेस स्पेशल आहे. वशिष्ठ नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मडगाव-लोंडा-मिराज होत डायवर्ट करण्यात आलं होतं. द हिंदू वृत्तपत्रानुसार दूधसागर-सोनॉलिम खंडवर इंजन आणि पहिल्या जनरल डब्यासह ट्रेन ट्रॅकवरुन खाली उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही.   ज्या कोचवर दरड कोसळली त्यातील प्रवाशांना अन्य डब्यांमध्ये हलविण्यात आले आहे. आणि ट्रेन पुढे पाठविण्यात आली आहे.

 

 

सातत्याने होणाऱ्या पावसानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळ मंडलच्या घाट खंडमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिला दूधसागर आणि सोनॉलिम स्टेशनमध्ये आणि दुसरं कारनजोल आणि दूधसागर स्टेशनदरम्यान घडली आहे.

You May Also Like