धक्कादायक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

मुंब |  मुंबई पोलिसांना शुक्रवारी अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.  संंबंधित व्यक्तिने मुंबईमधील प्रमुख तीन रेल्वे स्टेशन आणि बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. ही माहिती मिळताच सगळीकडे मुंबई पोलिसांकडून बॉम्बची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली.

 

 

 

सविस्तर वृत्त असे कि, अज्ञात व्यक्तिने फोन करून दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिली. त्या बॉम्बची तपासणी करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, दहशतवादविरोधी पथक, रेल्वे पोलीस, बॉम्ब शोधक आणि विल्हेवाट पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी शोध तपासणी सुरू केली परंतु मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही.

You May Also Like