अमेरिकेत फेडेक्स सेंटरवर गोळीबार; 4 शीख बांधवांसह 8 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन: अमेरिकेत गोळीबार हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. हा हल्ला अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका फेडेक्स सेंटरवर झाला आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाच्या चार शीख बांधवांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 8 जणांची निर्दयी हत्या केलेल्या 19 वर्षीय आरोपीनं स्वतः वरही गोळी झाडली आहे. ब्रँडन स्कॉट असं आरोपीच नाव असून तो इंडियानातील रहिवासी आहे.वृत्तसंस्थने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित हल्लेखोर आरोपी ब्रॅंडन स्कॉट पूर्वी फेडेक्सच्या सेंटरमध्ये काम करत होता.

दरम्यान, या गोळीबारामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून संबंधित हल्लेखोर फेडेक्सचा पूर्व कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.एका

इंडियाना राज्यातील संबंधित फेडेक्स सेंटरमध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचं काम करणाऱ्या लोकांमध्ये 90 टक्के लोकं भारतीय- अमेरिकन आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी स्थानिक शीख समुदायातील आहेत. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना, शीख समुदायाचे नेते गुरिंदर सिंह खालसा यांनी म्हटलं की, ‘ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून संपूर्ण शीख समुदाय दुःखात आहे.

मॅरियन काउंटी कोरोनरच्या कार्यालयानं मृतांची ओळख पटवली असून मृत झालेल्या लोकांची नाव- 32 वर्षीय मॅथ्यू आर. अलेक्झांडर, 19 वर्षीय सामरिया ब्लॅकवेल, 66 वर्षीय अमरजीत जोहल, 64 वर्षीय जसविंदर कौर, 68 वर्षीय जसविंदर सिंह, 48 वर्षीय अमरजीत सेखों, 19 वर्षीय करली स्मिथ आणि 74 वर्षीय जॉन वीसर्ट अशी आहेत.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like