तेलंगणातील कलेश्वरम प्रकल्पाविषयी ‘डिस्कव्हरी’वर लघुपट

मुंबई : तेलंगणातील कलेश्वरममध्ये गोदावरी नदीवर असलेल्या कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पावर डिस्कव्हरी वाहिनी विशेष डॉक्युमेंट्री दाखवणार आहे. ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ हा भव्य कलेश्वरम प्रकल्पाची महती सांगणारा आंतरराष्ट्रीय लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. तेलुगू भूमीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते.

डिस्कव्हरी वाहिनीवर ‘लिफ्टिंग अ रिव्हर’

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. या प्रकल्पाने आश्चर्यकारक मार्गांनी अनेकांच्या आयुष्याला कसा स्पर्श केला आहे, यावर या डॉक्युमेंट्रीतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

अभियांत्रिकी विश्वातील चमत्कार

एमईआयएल ने बांधलेला हा जगातील सध्याच्या घडीचा सर्वात मोठा मल्टी-स्टेज उपसा सिंचन प्रकल्प मानला जातो. हा अभियांत्रिकी विश्वातील चमत्कारच म्हटला जातो. भव्य कलेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प हा तेलंगणाचा अभिमान आहे. ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ या डॉक्युमेंट्रीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय मांडला जाणार आहे.

प्रख्यात दिग्दर्शक राजेंद्र कोंडापल्ली यांच्या नजरेतून ही दृकश्राव्य मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. इंग्रजीसह सहा भारतीय भाषांमध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 25 जून रोजी रात्री 8 वाजता ‘लिफ्टिंग अ रिव्हर’ हा लघुपट डिस्कव्हरी वाहिनीवर न चुकता पाहा

तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट :

You May Also Like

error: Content is protected !!