राज्यात करोना लसींचा तुटवडा; ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला

मुंबई: करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्व भूमीवर १ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मात्र महाराष्ट्राह अनेक राज्यांकडे लसींचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करतानाही अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच वापरला जाईल. या लसींचा साठा खासगी रुग्णालयांना करण्यात येणार नाही.

राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं ठाकरे सरकारनं आता खासगी रुग्णालयांना लसींचा साठा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून लसींचा साठा खरेदी करावा लागेल. तशी माहिती राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. यासोबतच खासगी रुग्णालयांकडे असलेला कोरोना लसींचा अतिरिक्त साठादेखील राज्य सरकार परत घेण्याची शक्यता आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like