वडिलाच्या मृतदेहासाठी भाऊ-बहिणीत हाणामारी

कानपूर । घरातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून भाऊ-बहिणी आणि जावयांमध्ये हाणामारी झाली. ही घटना कानपूरच्या बिल्होरमध्ये घडली आहे.

 

 

दरम्यान, ८५ वर्षाचे रामप्रसाद हे कॅन्सरमुळे दोन वर्षांपासून आजारी होते. दोन्ही मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. ज्यामुळे ते आपली मुलगी कमलेश कुमारीकडे राहण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व जमीन मुलीच्या नावावर केली होती. ज्यामुळे दोन्ही मुलं नाराज होते. गुरूवारी वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून परिवारात वाद झाला. हळूहळू मृत व्यक्तीच्या मुलांमध्ये आणि जावयांमध्ये वाद पेटला. मग बघता बघता भर चौकात एकमेकांना मारामारी सुरू केली. घटनास्थळी उपस्थित कुणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला.

 

 

You May Also Like